चंद्रपूर जिल्ह्यात व्याघ्र हल्ल्यात इसम ठार

Share This News

चंद्रपुर 24 फेब्रुवारी : मानव –वन्यजीव हल्ल्याच्या घटना चंद्रपूर जिल्ह्यात जारीच असून भद्रावती वनपरिक्षेत्रात वाघाने केलेल्या हल्ल्यात एक इसम ठार झाल्याची घटना घडली. सदर घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. यामुळे खळबळ माजली आहे. मोरेश्वर श्रीरामे (३६) हा इसम मंगळवारी सायंकाळी सायकलने इरई डॅम परिसरालगत गेला होता. तेथे सायकल ठेऊन आत अर्धा किमी अंतरावर भद्रावती वनपरिक्षेत्रातील गुलगाव नियतक्षेत्रात गेला असता दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर हल्ला करीत त्याच्या नरडीचा घोट घेतला. उशीर झाला तरी घरी न परतलेल्या इसमाच्या नातेवाईकांनी त्याचा गावकऱ्यांसह शोध घेतला. याबाबतची माहिती मिळताच समजताच घटनास्थळी ताबडतोब वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले. तेव्हा त्या इसमाचा मृतदेह बुधवारी दुपारी आढळून आला. दरम्यान वनविभागाने परिसरात गस्ती पथक नेमले आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.