अमरावती मधील एका गावात ३५ महिलांना भुताने झपाटले

Share This News

अमरावती : शिवरा गावातील ३० ते ३५ नागरीकांना भुताने झपाटल्याची अफवा पसरल्याने गावात खळबळ उडाली.
घटनेचा गैरफायदा घेत येथील एका मांत्रिकाने भुतबाधा झाले असल्याचे सांगत भुताटकी झाल्याचा बनाव करून भोळ्या फासे पारधींची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला. या अंधश्रद्धेमुळे येथील ५०० गावकरी सध्या दहशतीत जगत आहेत. गावात आलेल्या मांत्रिकाने अनेक महिलांना बेदम मारहाणही केली आहे.
पारधी समाजातील भोळ्या लोकांची फसवणूक होत असल्याचे समजताच प्रश्नचिन्ह शाळेचे मतीन भोसले स्वत: शिवरा गावात पोहोचले. मात्र त्यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. अखेर मतीन भोसले यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि पोलिसांना याबाबत कळविले. पोलीस घटनास्थळी पोहोचताच मंत्रिकांनी तेथून पळ काढला. भुताटकी झाली असा बनाव करून ३० ते ३५ जणांना मांत्रिकाने मारहाण केल्याचा प्रकार शिवरा गावात तीन दिवसांपासून सुरू होता.
याबाबत पारधी समाजातील सामाजिक कार्यकर्ते मतीन भोसले, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीकृष्ण धोटे यांनी अमरावती ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हरी बालाजी एन. यांना संपर्क साधला. पोलिस ताफा गावात येताच मांत्रिक पळून गेला.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.