गोंदियात नियम मोडणाऱ्या दिडशे जणांवर कारवाई, 98 जणांविरुध्द गुन्हे

Share This News

गोंदिया, ३ मे : राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. या अनुषंगाने जिल्ह्यात जमावबंदी व सचारबंदीचे आदेश जाहिर करण्यात आले आहे. असे असताना अनेकांकडून या आदेशाची पायमल्ली होत असल्याचेही पुढे येत आहे. दरम्यान, यावर प्रतिबंध लावण्यासाठी शहरातील जिल्हा वाहतूक पोलिस शाखा, रामनगर पोलिस ठाणे व शहर पोलिसांच्या वतीने गस्त व नाकाबंदी करून 146 जणांवर कारवाई करण्यात आली आहे. ज्यामध्ये 98 जणांविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला असता 48 जणांकडून 9 हजार 200 रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे. तर या कारवाई 8 दुचाक्यादेखील जप्त करण्यात आल्या आहेत. गोंदिया शहरात आता संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येत असल्याने विनाकारण रस्त्यावर फिरणार्या नागरीकांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.