भारतात २४ तासांत १९,५५६ नवे कोरोना रुग्ण
दिवसभरात ३४१ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू
नागपूर : जिल्ह्यात दिवाळीनंतर पुन्हा कोरोनाचा प्रकोप वाढताना दिसत आहे. मंगळवारीही जिल्ह्यात ३४१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. तर ७ बाधितांचा मृत्यू झाला. दरम्यान, नागपूर शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये कोरोना आटोक्यात असून शहरात मात्र फैलाव वाढत आहे. मंगळवार, २२ ऑगस्ट रोजी जिल्ह्यात ४ हजार ६६६ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यातील ३४१ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यामध्ये २७४ जण हे शहरातील असून ६५ जण हे नागपूर ग्रामीणमधील आहेत. तर २ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. आता जिल्ह्यात नोंद झालेल्या एकूण बाधितांची संख्या १ लाख २0 हजार ६२८ इतकी झाली आहे.नवे कोरोनाबाधित
नागपूर – ३४१ भंडारा – ५१
यवतमाळ – ५७
गोंदिया – २२
गडचिरोली – १९
बुलडाणा – ३७
चंद्रपूर – ८२
अमरावती – ६५
वर्धा – ५३हिंदुस्थान समाचार/नवी दिल्ली
प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात १९,५५६ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. ३0१ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३0,३७६ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे १,00,७५,११६ रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या २,९२,५१८ झाली आहे. एकूण ९६,३६,४८७ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,४६,१११ पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण १0,७२,२२८ नमुन्यांची तपासणी केली. आतापर्यंत देशात एकूण १६,३१,७0,५५७ चाचण्या घेण्यात आल्या आहेत. जागतिक कोरोना संकटात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने एका दिवसात एकूण १0,७२,२२८ नमुन्यांची तपासणी केली. आतापयर्ंत देशात एकूण १६,३१,७0,५५७ चाचण्या घेण्यात आल्या आहे.