भारतात २४ तासात ३७,९७५ नवे कोरोना रुग्ण
नागपुरात ३५६ पॉझिटिव्ह, ११ मृत्यू नागपूर जिल्ह्यात मंगळवारी दिवसभरात ३५६ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली तर ११ जणांचा मृत्यू झाला. मंगळवार, २४ नोव्हेंबर रोजी नागपूर जिल्ह्यात ३५६ कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात २६६ जण शहरातील, ८६ जण नागपूर ग्रामीणमधील तर ४ जण जिल्ह्याबाहेरील आहेत. मंगळवारी ७ हजार १८४ नमुने तपासण्यात आले. आता जिल्ह्यातील बाधितांची संख्या १ लाख ९ हजार ५६१ इतकी झाली आहे. यात ६७२ जण नागपूर जिल्ह्याबाहेरील आहेत. त्यांची तपासणी नागपुरात झाल्यामुळे नागपुरातील आकडेवारीत त्यांची नोंद होत आहे.मंगळवारी ११ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात गेल्या २४ तासात भारतात ३७,९७५ नवे कोरोना रुग्ण आढळले असून ४८0 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ४२,३१४ नवे नागरिक बरे झाले आहेत. भारतात कोरोनाचे ९१,७७,८४१ रुग्ण झाले असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या ४,३८,६६७ झाली आहे . एकूण ८६,0४,९५५ नागरिक बरे झाले आहेत. देशात मृतांचा आकडा १,३४,२१८ वर पोहचला आहे. ही माहिती केंद्रीय आरोग्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाकडून देण्यात आली. नवे कोरोनाबाधित नागपूर – ३५६ यवतमाळ – ५३ चंद्रपूर – १९९ गोंदिया – ११७ गडचिरोली – ११0 भंडारा – ६२ वाशीम – २१ अमरावती – ७७ वर्धा – ७५ |