माझ्या नावात ‘दया’ व शंकर’ दोन्ही,प्रशासनाने  ‘तांडव’ करण्याची वेळ आणू नये-दयाशंकर तिवारी

Share This News

दोन वर्षांचे काम एका वर्षात करायचे आहे व त्यात महापालिका आयुक्त मला पूर्ण सहकार्य करतील असा विश्वास असल्याचं  महापालिकेचे महापौर दयाशंकर तिवारी यांनी व्यक्त केला. नागपूर महानगर पालिकेच्या सिव्हिल लाईनच्या मुख्यालयात महापौर व उपमहापौर यांचा पदग्रहण समारंभ आयोजित करण्यात आला, यावेळी महापौर दयाशंकर तिवारी बोलत होते. भाजप आमदार कृष्णा खोपडे व महापालिका आयुक्त राधाकृष्ण या दोघांच्याही नावात ‘कृष्ण’ आहे. आयुक्तांच्या नावात कृष्णा सोबत राधा देखील आहे, राधा हे सौंदर्याचं प्रतीक आहे, त्यामुळे आयुक्तांच्या सहकार्याने  शहराला सुंदर बनवण्याचा मी संकल्प करीत असल्याचे तिवारी यावेळी म्हणाले.

‘माझ्या नावात ‘दया’व ‘शंकर’ आहे, शंकराच्या वरातीत सर्वच सामील होतात त्याप्रमाणे माझ्या चांगल्या कार्यात सर्वच सामील होतील अशी अपेक्षा आहे. महापालिका प्रशासन चांगल्या प्रकारे कार्य करून समतोल साधेल  नाही तर शंकराला ‘तांडव’ देखील करावा लागतो. परंतु तशी वेळ येणार नाही असेही दयाशंकर तिवारी म्हणाले. करोना चा काळ हा महापालिकेच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय  ठरला आहे. यावेळी करोना च्या काळात संपूर्ण शहरवासीयांनी कार्य केले हे केवळ महापालिका प्रशासनाच्या भरवशावर लढली जाऊ शकत नव्हती त्यामुळे नागपूरच्या जनतेचे अभिनंदन करतो. वयोवृद्ध आईसमोर महापौरपदाचे पदग्रहण करणे हि सर्वात आनंदनाची बाब असल्याचे महापौर यावेळी म्हणाले.”


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.