नागपुरात लहान भावाने केली मोठ्याची हत्या

Share This News

नागपूर : मद्यप्राशन करून शिवीगाळ करणाऱ्याची लहान भावाने काठीने वार करून हत्या केली. ही घटना काटोलपासून दहा किलोमीटर अंतरावरील इसापूर खुर्द येथे घडली. रोशन नागोराव ठाकरे (वय २५) हे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी काटोल पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नितेश नागोराव ठाकरेला (वय २३)अटक केली आहे.
१६ फेब्रुवारीला रात्री आठ वाजताच्या सुमारास नितेश जेवण करीत होता. त्यावेळी मद्यप्राशन करून आलेल्या रोशनने लहान भाऊ नितेशला शिवीगाळ केली. यामुळे संतप्त नितेशने रोशनला काठीने मारहाण केली. यात रोशनचा मृत्यू झाला. काटोल पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला. तपासादरम्यान नितेशने मारहाण केल्याने रोशनचा मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून नितेशला अटक केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.