नागपुरात परिस्थिती अत्यंत चिंताजनक, चोवीस तासात ६,८२६ नवे रुग्ण आढळले

Share This News

नागपूरः नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे संकट अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचत असून मागील चोवीस तासात संसर्ग झालेले सुमारे ६,८२६ नवे रुग्ण आढळून आले असल्याने आता सक्रीय रुग्णांची संख्या ६१ हजारांवर पोहोचली आहे.
प्रशासनाने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडीवारीनुसार, नागपूर जिल्ह्यात मागील चोवीस तासात आणखी ६,८२६ नव्या रुग्णांची भर पडली आहे. यात नागपूर शहरातील ४६७५ तर नागपूर ग्रामीणमधील २१४४ रुग्णांचा समावेश आहे. कोरोनापायी ६५ मृत्यू झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या ६१,०६२ वर पोहोचली आहे. तब्बल २९,१२२ आरटीपीसीआर चाचण्या करण्यात आल्या आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.