नव्या कार्यकारणीवरून शिवसेनेत घमासान
नागपूर शिवसेनेतील नवीन कार्यकारिणीच्या नियुक्तीवरून सुरू झालेल्या वादाचा आता विस्फोट झाला आहे. नाराजांनी थेट कार्यकारिणीच बरखास्त करण्याची मागणी केली आहे. याचदरम्यान ९ पदाधिकार्यांनी राजीनामेदेखील दिले.
बाहेरून पक्षात आलेल्यांना महत्वाची पदे देण्यात आली आहेत. जे पक्षात आधी मोठय़ा पदावर होते, त्यांना कनिष्ठ पदावर घेण्यात आले. अनेक जुन्याजाणत्यांना जबाबदारीच देण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. करण्यात आलेली नवीन कार्यकारिणी बरखास्त करावी, ५ लोकांची एक समिती तयार करावी, या समितीच्या शिफारशीनुसार नवीन कार्यकारिणी गठीत करावी, अशी मागणी करण्यात आली. यावेळी नवीन कार्यकारिणीतील ९ पदाधिकार्यांनी राजीनामे दिले. यात माजी नगरसेवक जगतराम सिन्हा, योगेश न्यायखोर, पवन मोटघरे, संजय मोहरकर, राजेश बांडेबुचे, द्वारका साहू, राजू शिर्के, पांडुरंग हिवराळे, शेषराव कोरे यांचा समावेश आहे.