शेतकरी आंदोलनाला पाठिंबा, ट्रॅक्टर चालवित आली वधू

Share This News

यवतमाळ : कृषी कायद्याला विरोध करणाऱ्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी नववधू ट्रॅक्टर चालवित आली. वाजत गाजत आलेल्या या वधुने अनेकांचे लक्ष वेधून घेतले. घटना आहे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील.
केंद्र सरकारने लागू केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. देशभर शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला पाठींबा मिळत आहे. आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राळेगाव येथे नववधू ट्रॅक्टर चालवित विवाहस्थळी पोहचली. राळेगाव तालुक्यातील सावरखेडा येथील शेतकरी पंढरीनाथ दुर्गे यांच्या प्रणाली नामक मुलीचा विवाह चंद्रपूर येथील निकेश झोटिंग याच्याशी राळेगाव येथे झाला. नेहमी नवरा मुलगा वाजतगाजत घोड्यावर बसून विवाहमंडपी येतो, पण याठिकाणी वधू प्रणालीने नवीन पायंडा पाडला. शेतीला असलेले महत्व लोकांना दाखवून देण्यासाठी ती फुलांच्या माळांनी सजविलेल्या ट्रॅक्टरवर बसून आली. आंदोलन करीत असलेल्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासायठी ट्रॅक्टरने आपण विवाहस्थळी आल्याचे प्रणालीने सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.