गोंदिया सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले

Share This News

जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून सुरवातीच्या दोन फेऱ्यात महाविकास आघाडीकडे कल असल्याचे स्पष्ट झाले आहे. तिरोडा तालुक्यातील पालडोगरी ग्राम पंचायतीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला असून १० पैकी १ भाजपला तर ९ जागेवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी समर्थित ग्राम विकास पॅनलची सरशी झाली आहे. सडकअर्जुनी तालुक्यातील रेगेपार पांढरी ग्राम पंचायतिल ९ पैकी ९ जागेवरील उमेदवार ग्राम विकास पॅनलचे निवडून आले आहेत. या पॅनलला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिला आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.