यवतमाळात जिल्हाधिकारी उतरले रस्त्यांवर

Share This News

यवतमाळ : मध्यंतरीच्या काळात कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात होती. मात्र यवतमाळात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत चालल्याने शासनाने कडक प्रतिबंध यवतमाळात लादले आहेत. त्यामुळे परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह रस्त्यावर उतरले आहेत.
कोरोनाचे संकट गडद झाल्याने यवतमाळमध्ये लॉकडाउन करण्यात आले आहे. नागरिक विना मास्क फिरत असल्याने व बाजारपेठेतील गर्दी वाढत असल्याने पोलिस विभागाच्या मदतीने जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: कारवाईला सुरुवात केली आहे. अशात जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी स्थानिक बसस्थानक चौकात थांबत नागरिकांना मास्क घालण्याच्या सूचना दिल्या. विनामास्क फिरणाऱ्यांना दंडही केला. रुग्णसंख्या वाढू नये म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी, शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, मास्क वापरावा, सोशल डिस्टन्स ठेवावे अशा सूचना केल्या. यवतमाळात परिस्थिती बिकट झाल्यानंतर कडक प्रतिबंध घालण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी अलीकडेच झालेल्या व्हिडीओ बैठकीत दिले आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.