महापौर दयाशंकर तिवारी यांचा पदग्रहण सोहळा LIVE UPDATE–
महानगर पालिकेचे नवनियुक्त महापौर दयाशंकर तिवारी व उपममहापौर मनीषा धावडे यांचा पदग्रहण सोहळा आज पार पडत आहे. नागपूर महानगर पालिकेच्या सिव्हिल लाईन मधील मुख्यालयात पद्ग्रहणाचा कार्यक्रम होत आहे. यावेळी या कार्यक्रमाला माजी महापौर संदीप जोशी, तानाजी वणवे,राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे, दटके,कृष्णा खोपडे आदी मान्यवर उपस्थित आहेत. ज्याप्रमाणे सव्वा वर्ष दयाशंकर तिवारी माझ्या पाठीशी उभे होते तसाच लहान भाऊ म्हणून त्यांना मी साथ देणार असल्याचं यावेळी माजी महापौर संदीप जोशी बोलले. तर महापौर म्हणून दयाशंकर तिवारी व उपमहापौर म्हणून मनीषा धावडे या शहराच्या विकासासाठी उत्तम कार्य करणार अशा शुभेच्छा महापालिकेतील विरोधी पक्ष नेते तानाजी वणवे यांनी दिल्या. येणारे वर्ष हे दयाशंकर तिवारींसाठी आव्हानात्मक राहणार असून ते शहराच्या अपेक्षा पूर्ण करतील असा विश्वास आमदार कृष्णा खोपडे यांनी व्यक्त केला.