चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी उमेदच्या ३ हिराई मार्टचे उदघाटन Inauguration of 3 Hirai Marts of Umed on the same day in Cha

Share This News

 चंद्रपूर 27 जानेवारी ग्रामीण भागातील स्वयंसहायता समुहांच्या महिलांना रोजगार मिळावा तसेच स्थानिक उत्पादनां बाजारपेठ मिळावी यासाठी २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद परिसर, पंचायत समिती ब्रम्हपूरी येथे हिराई रुरल मार्ट, तर बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव पोडे येथे घरकुल मार्टचे मान्यवरांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अंतर्गत जिल्हयात सुमारे १८ हजार स्वयंसहायता समुह कार्यरत आहे. अभियानाने दिलेल्या प्रशिक्षणामुळे शेतीसह अनेक समुह छोटया उदयोगांकडे वळले आहेत. यात स्थानिक स्तरावरील संसाधने वापरुन खाद्य श्रेणीतील पदार्थ, शोभीवंत वस्तु आदी तयार केल्या जात आहेत. या उत्पादनांना उमेद अभियानाकडून ‘हिराई’ या नावाने बाजारात आणले जात आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर येथील मार्टचे उदघाटन जि.प. अध्यक्ष संध्या गुरनुले यांनी केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अभियान सहसंचालक शंकर किरवे, उपाध्याक्ष रेखा कारेकर, सभापती नागराज गेडाम, सभापती सुनील उरकुडे, सभापती राजू गायकवाड जिल्हा अभियान व्यवस्थापक गजानन ताजने उपस्थित होते.
 हिराई रुरल मार्टमध्ये विविध प्रकारचे लोणचे, विविध प्रकारचे मसाले, सेंद्रीय तांदूळ, कलाकुसरीच्या वस्तू, पापड, महिलांनी परिधान करावयाचे हातांनी तयार केलेले दागिने आदी वस्तू उपलब्ध आहेत. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष ब्रम्हपुरी तर्फे पंचायत समिती येथील हिराई रूरल मार्टचे उदघाटन पंचायत समिती सभापती दोनाडकर यांच्या हस्ते करण्यात आले, तर तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बल्लारपूर यांच्या वतीने नांदगाव पोडे येथील आनंद ग्रामसंघाद्वारे संचालित घरकुल मार्टचे उदघाटन मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आले. या मार्टमध्ये सिमेंट, लोखंड व घरकुलास उपयोगी सर्व वस्तू किफायतशीर दरात उपलब्ध असणार आहे. या कार्यक्रमांच्या औचित्याने जिल्हा परिष्द अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्रामीण भागातील महिलांनी केलेल्या उत्पादनांची खरेदी करुन त्यांचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केले आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.