प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गोरेवाडा उद्यानाचे उदघाटन 

Share This News

अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या इंडियन सफारीचा मुहूर्त अखेर ठरला आहे. २६ जानेवारीला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उदघाटन होणार आहे. या प्राणी संग्रहालयाला दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.  या प्राणी  संग्रहालयाला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात गती मिळाली होती. आता या कामाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांकरिता इंडियन सफारीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे २६ जानेवारीला या इंडियन सफारीचे उदघाटन करणार आहेत. नागपूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर सुमारे दोन हजार हेक्टर वन परिक्षेत्रावर हे प्राणी संग्रहालय उभारण्यात आले आहे. इंडियन सफारी करिता वाघ,अस्वल,बिबट,हरीण,नीलगाय या प्राण्यांचे इथे स्थानांतरण करण्यात आले आहे. या सफारीसाठी ४० आसनक्षमता असलेली ३ वाहने व ऑनलाईन तिकीट बुकिंग ची सोया उपलब्ध करून देण्यात आली आहे. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.