‘सलून दुकानदार, टॅक्सीचालक, शेतकऱ्यांचा पॅकेजमध्ये समावेश करा’|‘Include saloon shopkeepers, taxi drivers, farmers in the package’

Share This News

मुंबईः राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये केश कर्तनालय कर्मचारी, टॅक्सी चालक, मुंबईचे डबेवाले, शेतकरी तसेच अनेक छोट्या व्यवसायिकांचा समावेश नाही. या घटकांसाठी पॅकेजमध्ये तरतूद करावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.
लॉकडाऊनमुळे हे घटक देखील मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेले आहेत. दोन दिवसांपूर्वी सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये या घटकांचा समावेश नाही. त्यामुळे सरकारने तातडीने विचार करून या घटकांचाही पॅकेजमध्ये समावेश करण्याची गरज आहे. काँग्रेस पक्ष त्यासाठी आग्रही राहणार असल्याचे पटोले म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.