किसान रेलने महाराष्ट्रात फुलांची लागवड करणाऱ्या छोट्या ग्रीन हाऊस उत्पादकांना वाढीव उत्पन्न Increased income for small greenhouse growers cultivating flowers in Maharashtra by Kisan Rail

Share This News

मुंबई, १४ मार्च : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आतापर्यंत किसान रेलच्या २०० फेऱ्यांद्वारे ६१,२५२ टन नाशवंत शेती उत्पादनांची वाहतूक केली आली आहे. रेल्वेने लातूर आणि उस्मानाबादच्या आसपासच्या लोकांच्या जीवनावर प्रभाव पाडला आहे.
किसान रेल, लहान शेतकर्‍यांना जलद वाहतूक, सुरक्षित वितरण आणि नाशवंत मालाचा शून्य अपव्यय यासह मोठ्या आणि दूरदूरच्या मार्केटमध्ये जास्तीत जास्त प्रवेश देऊन सक्षम करीत आहे आणि त्यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढवित आहे.


भारतीय रेल्वेच्या किसान रेलने  महाराष्ट्रातील अनेक लहान शेतकर्‍यांच्या जीवनात परिवर्तन आणत आहे, त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असून त्यांचे जीवनमान, उदरनिर्वाह, समृद्धी आणि भविष्याची आशा या सर्वांनी प्रेरित केले आहे. अलीकडे, महाराष्ट्रातील लातूर आणि उस्मानाबाद भागातील छोट्या शेतकऱ्यांनी प्रथमच कुर्डूवाडी स्टेशन ते आदर्श नगर दिल्ली पर्यंत किसान रेलमध्ये फुलझाडे भरली आणि त्याद्वारे नवीन बाजारपेठेत प्रवेश मिळाल्याने उत्पन्न वाढीस मदत झाली.
९ मार्च २०२१ रोजी प्रथमच लातूर आणि उस्मानाबाद भागातील छोट्या ग्रीन हाऊसच्या शेतकर्‍यांनी कुर्डूवाडी स्टेशन ते आदर्श नगर दिल्ली पर्यंत किसान रेलमध्ये ६५० किलो वजनाची फुले पाठवून देण्यात आली. महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पडोली, वाघोली, तेर, पनेवाडी आणि उपळा या गावात आणि लातूर जिल्ह्यातील मुरुड येथे ह्या फुलांची लागवड केली गेली. एक / दोन एकर जमीन असलेले छोटे शेतकरी किसान रेल्वेमार्फत अत्यंत नाशवंत अशा फुलांची जलद आणि स्वस्त वाहतूक करून नवीन बाजारपेठेत प्रवेश करण्यास उत्सुक आहेत कारण त्यांना जास्त किंमत मिळत आहे. उस्मानाबादमधील दुमाळा येथील श्रीधर भीमराव काळे हे एक छोटे शेतकरी किसान रेलमुळे दिल्लीत मोठ्या आणि नवीन बाजारपेठेत पोहोचल्याबद्दल उत्साहीत  आहेत. ते म्हणाले की,“फुले आता जलद आणि कमी किंमतीत बाजारात आणली जातात आणि अत्यंत फायदेशीर किंमतीला विकली जातात”. लातूर जिल्ह्यातील मुरुड खेड्यातील शेतकरी बिभीशण नाडे म्हणाले की, “किसान रेल मला दिल्लीच्या बाजारपेठेत नेते आणि माझ्या फुलांसाठी कमी वाहतुकीच्या किंमतीत  अधिक किंमत मिळवून देते”.
भारतीय रेल्वेने सुरू केलेली किसान रेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या जीवनात हळुवारपणे बदल घडवून आणत आहे. या महामारीच्या दरम्यान महाराष्ट्रातील सोलापूर, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, अमरावती आणि नाशिक इत्यादी जिल्ह्यातून नाशवंत वस्तू (फळे आणि भाज्या) तसेच आवश्यक वस्तूंची दिल्लीतील एनसीआर, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि भारताच्या ईशान्य प्रदेशातील विविध नवीन बाजारपेठांमध्ये अखंड पुरवठा साखळी तयार करुन त्यांचे उत्पन्न वाढविण्यास सक्षम केले आहे. १२ मार्च २०२१ पर्यंत महाराष्ट्रातून ६१,२५२ टन नाशवंत शेती उत्पादने किसान रेलच्या २०० फेऱ्यांमध्ये लोड करण्यात आले आणि मोठ्या संख्येने अल्पभूधारक शेतकर्‍यांचे जीवनमान बदलत गेले. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.