हिंदुस्थानात ग्लॉकोमा रुग्णांची संख्या सर्वाधिक India has the highest number of glaucoma patients

Share This News

हिंदुस्थानात ग्लॉकोमा या विकाराने 12 दशलक्ष लोकांना प्रभावित केले असून 90 टक्क्यांहून अधिक केसचे निदान होऊ शकलेले नाही. आपल्या देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या अधिक आहे. वाढत्या मधुमेहाच्या तक्रारीसोबत दृष्टीत वक्रपणा येणे यामुळे आपल्या ग्लॉकोमासारखे विकार वेगाने बळावले आहेत. जगातील एकूण दृष्टीहिनांपैकी 20 टक्के व्यक्ती आपल्या देशात आहेत असे डॉ. अग्रवाल्स आय हॉस्पिटलच्या डॉ. स्नेहा मधुर कांकरिया यांनी सांगितले. या विकाराचे शक्य तितक्या लवकर निदान हाच ग्लॉकोमापासून उद्भवणाऱ्या अंधत्वाला प्रतिबंध करण्याचा मार्ग आहे असेही त्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.