गूगल, मायक्रोसॉफ्टकडून भारताला लाभणार सहकार्य

Share This News

वॉशिंग्टन डी सी, 26 एप्रिल  प्रदीर्घ जागतिक कोरोना संकटात भारतात निर्माण झालेल्या स्थितीवर गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई  आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी तीव्र दु:ख आणि वेदना व्यक्त केल्या. दोन्ही मान्यवरांनी संदेशाद्वारे भारताला कोरोनाच्या दुस-या लाटेशी सामना करण्यासाठी शुभेच्छा आणि सदिच्छा दिल्या.

ट्वीटर द्वारे आपल्या भावना व्यक्त करताना सुंदर पिचाई म्हणाले, ” भारतात खालावत चाललेल्या कोरोना संकटाकडे पाहून उध्वस्त झालो आहे. गूगल आणि गूगलमध्ये कार्यरत नागरिक 135 कोटी रुपयांचा निधी युनिसेफद्वारे भारताला प्रदान करीत आहे. यात वैद्यकीय सामग्री, पुरवठा, अत्याधिक धोका असलेल्या नागरिकांसाठी सामान तसेच महत्वाची माहिती पुरविण्यासाठी याचा उपयोग होईल. “

तर सत्या नाडेला म्हणाले, ” भारतातील परिस्थिती हृदय द्रावक आहे. भारताला मदत केल्याबद्दल मी अमेरिका सरकारचे धन्यवाद मानतो.  मायक्रोसॉफ्ट बचाव कार्यसाठी सामग्री आणि तंत्रज्ञान पुरवीत राहील तसेच  महत्वाचे आणि आवश्यक प्राणवायू विषयक उपकरणे विकत घेण्यासाठी मदत करेल. “


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.