महागाईने गाठला २७ महिन्यांचा उच्चांक; फेब्रुवारीत महागाई दर ४.१७ टक्के! Inflation hits 27-month high; Inflation rises to 4.17 per cent in February

Share This News

सध्या महागाईने सर्वसामान्य जनतेचं कंबरडं मोडलं आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यात खाण्या-पिण्याच्या वस्तूंसह वीजबील आणि इंधनाच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचे समोर आले आहे. यासोबतच महागाई सलग दुसऱ्यांदा वाढली असून २७ महिन्यांची उच्चांकी पातळी महागाईने गाठल्याचे दिसतेय. WPI (घाऊक किंमत निर्देशांक आधारित) फेब्रुवारी महिन्यात महागाईचा दर ४.१७ टक्के होता. जानेवारीत हे प्रमाण २.०३ टक्के होते. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात हे प्रमाण २.२६ टक्के होते. नव्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी महिन्यात किरकोळ महागाईचा दर ५.०३ टक्के होता.

ही महागाई वाढत असताना त्या वाढीबरोबरच खाद्यपदार्थांच्या किंमतीही मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसले. वार्षिक आधारावर, त्यांच्या किमतींमध्ये १.३६ टक्क्यांनी वाढ झाली असून यावर्षी जानेवारी महिन्यातील वार्षिक आधारावर २.८० टक्क्यांनी ही महागाई घसरली असल्याचे नोंदविण्यात आले आहे. परंतु फेब्रुवारी महिन्यात महागाई वाढल्याने सर्वसामान्याचं आर्थिक बजेट पुन्हा एकदा कोलमडल्याचे समोर आले आहे.

जानेवारी महिन्यात खाण्या-पिण्याच्या पदार्थांच्या किमतीत ०.२६ टक्क्यांनी घसरण झाली होती. जानेवारी महिन्यात भाजीपाल्याचे दरही कमी असल्याची नोंद करण्यात आली होती. जानेवारी महिन्यात भाजीपाल्यांच्या किमतीत २.९० टक्क्यांनी घट झाली होती. नुकतीच इंधनाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाल्याने या महागाईचा फटका सर्वसामान्यांना अधिक बसल्याचे दिसून आले. एकूणच मागच्या वर्षाची तुलना यंदाच्या वर्षाशी करता यंदा असलेल्या महागाईने उच्चांक गाठल्याचे समोर आले आहे. ICRA च्या अर्थशास्त्रज्ञ आदिती नायर यांनी सांगितले की, यंदा असणारी महागाई दुप्पट झाली आहे. कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे यंदा सर्वत्र महागाई वाढली असून सर्वसामान्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काही महिन्यांत महागाई कमी होण्याची शक्यता आहे, असे ते म्हणाले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.