वीज बिल विरोधात तीव्र आंदोलन, पोलीस व आंदोलकांत झटापट

Share This News

करोना काळात आलेले वीज बिल माफ करून सरकारने वीज बिल भरावे याकरिता राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या निवास्थानावर आज ‘वीज व विदर्भ मार्च’ काढण्यात आला.विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने या मार्च चे आयोजन करण्यात आले होते. करोना काळात लॉक डाऊन दरम्यान अनेक वीज ग्राहकांना भरमसाठ विजेची बिल आले आहेत. ही वाढीव वीज बिल माफ करण्यात यावे किंवा या बिलातून ग्राहकांना सूट देण्यात यावी याकरिता विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. यातच आज नागपूरच्या संविधान चौक ते ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या निवावस्थाना पर्यंत मार्च चे आयोजन करण्यात आले होते.
वीज बिल सरकारने भरावे, 200 युनिट पर्यंत वीज बिल सरकारने भरावे, कृषी पंपांचे वीज बिल संपवावे, विदर्भातील अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती करावी अश्या मागण्या यावेळी आंदोलकांनी लावून धरल्या.
या मार्च मध्ये मोठ्या संख्येने विदर्भवादी सहभागी झाले होते. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या बेझनबाग येथील निवस्थानी पोहचण्या अगोदरच कडबी चौकातून या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी आंदोलनकर्ते व पोलिसांत झटापट देखील झाली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.