भाजयुमो साधणार तरुणाईशी संवाद

Share This News

मुंबई : भारतीय जनता युवा मोर्चा राज्यातील तरुणाईला सोबत घेऊन सकारात्मक कार्य करण्यासाठी विशेष अभियान राबविणार आहे. १८ ते २५ वयोगटातील तरुणाईला योग्य दिशा देण्याचे काम या अभियानाच्या माध्यमातून केले जाईल, अशी माहिती भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत दिली. माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यावेळी उपस्थित होते.
राज्यातील तरुणाईला भरकटविण्याचे काम काही आसुरी शक्ती करीत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील तरुणाई दिशाहीन होत आहे. या तरुणाईला विरोधक किंवा टीकाकार न बनविता सृजनशील बनविण्याचे काम भारतीय जनता युवा मार्चा करणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले. आगामी काळात राज्यातील प्रत्येक घरात जाऊन १८ ते २५ वयोगटातील तरुण-तरुणींशी संवाद साधण्यात येणार आहे. त्यांना योग्य कास आणि अयोग्य काय, याची माहिती देण्यात येणार आहे. तरुणाईला त्यांच्या करिअरच्या दृष्टीने उपयोगी पडेल असे शिक्षण, प्रशिक्षण, समुपदेशन देण्यावर भर राहणार असल्याचे पाटील यांनी नमूद केले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.