नागपूर शहर पोलीस दलात आंतरिक फेरबदल,तब्बल २१ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

Share This News

नागपूर शहर पोलीस दलात आंतरिक फेरबदल करण्यात आले आहेत. सहायक पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी बदल्यांचे हे आदेश जारी केले आहेत. यात सहायक पोलीस आयुक्त दर्जाचे तीन अधिकारी व पोलीस निरीक्षक दर्जाच्या २१ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुन्हेशाखेचे  सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार यांची बदली सदर विभागाच्या सहायक पोलीस आयुक्तपदी, सदर विभागाच्या सहायक आयुक्त रेखा भवरे यांची बदली विशेष शाखेत, तर जरीपटका विभागाचे सहायक पोलीस आयुक्त पी एम कार्यकर्ते यांची बदली एमआयडीसी विभागात करण्यात आली आहे. यासोबत २१ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांचे आंतरिक फेरबदल करण्यात आले आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात अचानक करण्यात आलेल्या  पोलीस निरीक्षकांच्या बदलामुळे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बदली करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकांपैकी काही अधिकाऱ्यांचा एक वर्षाचाही कार्यकाळ पूर्ण झाला नव्हता. 


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.