नागपुरातील पोलिस ठाण्याजवळ सापडले आतडे

Share This News

नागपूर : शहराच्या गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या मागील परिसरात आतडे आढळल्याने खळबळ उडाली आहे. आतड्यासह काही अवयवही येथे सापडले आहेत. शुक्रवार, १९ फेब्रुवारीच्या रात्री उशिरा हा प्रकार आढळला.
घटनेची माहिती मिळताच गिट्टीखदान पोलिसांनी परिसरात शोध सुरू केला. पोलिस ठाण्याच्या अगदी मागे असलेल्या परिसरात काही अंतरावर हा प्रकार उघडकीस आला. घटनेची माहिती गिट्टीखदान पोलिसांनी वरिष्ठांना दिली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलाविण्यात आले. परिसरात आढळलेले आतडे व अवयव मानवी आहेत की एखाद्या प्राण्याचे याचा शोध सुरू करण्यात आला. प्रथमदर्शनी आढळलेले अवयव मानवी नसावे असा अंदाज व्यक्त करण्यात आला, मात्र खात्री पटविण्यासाठी पोलिसांनी डॉक्टरांच्या मदतीने पुढील तपास सुरू केला. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत हा तपास सुरू होता


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.