पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी सखोल चौकशी करा

Share This News

बीड जिह्यातील 22 वर्षीय पूजा चव्हाण हिच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे यांच्याकडे केली. फडणवीस यांनी पोलीस महासंचालकांना यासंदर्भात पत्र पाठवले.

त्या पत्रासोबत याप्रकरणी व्हायरल होत असलेल्या ऑडियो क्लिप्सची प्रतही दिली. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणातील काही ऑडियो क्लिप्स सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून 12 ऑडियो क्लिप्स आपल्या कार्यालयालाही मिळाल्या आहेत. त्या क्लिप्समधील व्यक्ती कोण आहेत आणि त्यांच्या संवादाचा पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाशी संबंध आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. बंजारा समाजातही या प्रकरणाबद्दल संशय निर्माण झाला आहे, असे फडणवीस यांनी पत्रात लिहिले आहे.

दरम्यान, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही या प्रकरणी पोलिसांनी स्युमोटो अंतर्गत तक्रार दाखल करून संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.