जी-७ परिषदेसाठी मोदींना निमंत्रण

Share This News

लंडन : जी ७ राष्ट्रांच्या परिषदेसाठी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी त्यांचे भारतीय समपदस्थ नरेंद्र मोदी यांना निमंत्रण दिले आहे. या वर्षांच्या मध्यात ब्रिटनच्या किनारी भागातील कॉर्नवॉल येथे होणार्‍या ही उच्चस्तरीय परिषद ११ ते १३ जून या कालावधीत ब्रिटनच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. गेल्या वर्षी दक्षिण कोरिया व ऑस्ट्रेलिया यांच्यासोबतच भारताची या बहुपक्षीय परिषदेतील पाहुणे देश म्हणून निवड करण्यात आली, त्या वेळी जॉन्सन यांनी मोदी यांना दूरध्वनीवरून परिषदेत सहभागाचे निमंत्रण दिले होते. त्याची औपचारिक घोषणा रविवारी करण्यात आली. करोनाच्या संकटामुळे जॉन्सन यांची या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्या समारंभातील भेट रद्द करण्यात आली. ते या समारंभातील प्रमुख पाहुणे होते. त्यानंतर जी ७ परिषदेपूर्वी भारताला भेट देण्याचा मनोदय जॉन्सन यांनी व्यक्त केला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.