कोरोनाचा संसर्ग झालेली आयपीएल क्रिकेट स्पर्धा अखेर स्थगित

Share This News

मुंबईः कोरोनाच्या संसर्गाचे संकट अधिकच गंभीर बनल्याने आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने मंगळवारी यासंदर्भात घोषणा केली. या स्पर्धेतील दोन खेळाडू कालच पॉझीटीव्ह आढळून आले होते. मंगळवारी सकाळी सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज आणि विकेटकिपर वृद्धीमान सहा याला देखील करोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्याने बीसीसीआयने हा तडकाफडकी निर्णय घेतला. केकेआरमधील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे आढळल्यावर कालची कोलकाता आणि बेगळुरु लढत स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
आयपीएलच्या बायो बबलमध्ये राहणाऱ्या लोकांनाही संसर्ग होत असल्याने काळजीपोटी हा निर्णय घेण्यात आल्याचे बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितले. स्पर्धा पुन्हा कधी होणार याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.