आपघातात पाय गमावलेल्यांना IRC ने मिळवून दिले कृत्रिम पाय…! IRC provides artificial limbs to those who lost their legs in the accident…!

Share This News

औरंगाबाद, दि.18 मार्च- नेहमी गरजूंना व आजारी असलेल्या रुग्णांना औषधी, औषधोपचार करण्यासाठी पुढाकार घेत असलेल्या आयआरसी(Islamic Research Centre) सामाजिक कार्यात अग्रेसर असते. त्यांनी अपघातात पाय गमावलेल्या गरजूंना कृत्रिम पाय भेट देवून आधार दिला यावेळी लाभार्थ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले.
वयाच्या १२ व्या वर्षी शाळेत वेळेवर पाेहचण्यासाठी रुळावरुन जाताना अचानक रेल्वे पायावरुन गेली आणि पाय गमवावा लागला, असा प्रसंग विनयाकवर ओढवला होता. तसाच प्रसंग फेरोजसोबत घडला. तो घाईत रेल्वेगाडीत बसण्यासाठी चढतानाच अचानक तोल गेला आणि फेरोजचा या अपघातात पूर्ण पाय कापावा लागला. कन्नड येथील ७० वर्षीय आजोबा प्यारे मोहम्मद यांचा पाय मात्र एका दुर्धर आजारामुळे कापण्यात आला. तर अख्तर अली यांचा १९९९ मध्ये दुचाकीत झालेल्या अपघातामुळे पाय गमवावा लागला. या चार जणांना इस्लामिक रिसर्च सेंटरच्या वतीने माेफत कृत्रिम पाय देण्यात आले. खरं तर पाय देण्यासाठी प्रत्येकाच्या घरी जाण्याची तयारी होती, मात्र लॉकडाउनमुळे त्यांना बोलावून पाय देण्यात आले, असे आयआरसीचे अध्यक्ष अँड. फैज सय्यद म्हणाले. प्यारे मोहम्मद यांचा १४ महिन्यापूर्वी ऑपरेशनमध्ये पाय कापण्यात आला. त्यामुळे पहिल्यांदाच लावण्यात आलेल्या पाय बघून ते खूष होते आणि लहान मुलांसारखा अडखडत पाय टाकण्याचा प्रयत्न करीत होते. फेरोज रिक्षाचालक आहे. त्यांना दोन मुले आहे. गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे वर्षभर रिक्षा उभीच होती. त्यात त्यांचा जुना कृत्रिम पाय खूपच खराब झाला होता. वारंवार रिपेअर करुन आता त्याचे तुकडे होत होते. विनायकही प्लंबर असून मिळेल तो काम करुन आई-वडीलांना सांभाळतो. मुलाला पुन्हा एकदा पाय मिळाल्यावर त्यांच्या आईचे अश्रू अनावर झाले होते. अख्तर अली एका साडीच्या दुकानात सेल्समन आहे. त्यांनाही दोन मुले आहेत. गेल्या वर्षी त्यांच्याही काम पूर्णपणे बंद होता. वर्षभर रेशनाची व्यवस्था लोकांनी केली आता पाय खराब झाल्यावर त्यांच्यावर ओझ घालण्याचा विचार नसल्याने जुन्या तुटलेल्या पायावरच काम चालवता होतो, असे अख्तर म्हणत होते. आयआरसीच्या वतीने कृत्रिम पाय गरजूंना आधार बनले त्यांना पायचे वाटप करताना यावेळी घाटीतील डॉ. ओमर यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमासाठी पत्रकार सय्यद मोहसिना, ख्वाजा अलीमुद्दीन, नसीम खान यांनी सहकार्य केले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.