कार्यालयात कामाच्या वेळेत केस विंचरत बसणे हे गंभीर गैरवर्तन
मे.मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने कामाच्या वेळी केस विंचरायला जाणं हा गंभीर गैरवर्तनाचा प्रकार असल्याचं म्हटलं आहे.एक गिरणी कामगार विरुद्ध कंपनी या खटल्यामध्ये मे.न्यायालयाने हे निरिक्षण नोंदवलं आहे.या कामगाराने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर हात उगारला आणि त्याला धक्काबुक्की केल्याचा आरोप कंपनीने केला होता.अशाप्रकारे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वागणं हे गंभीर गैरवर्तन असल्याचंही मे.न्यायालयाने म्हटलं आहे.रंगाराव चौधरी असं याचिका दाखल करणाऱ्या गिरणी कामगाराचं नाव आहे.डिसेंबर २००५ मध्ये मे.कामगार न्यायालयाने दिलेल्या निर्णयाला आवाहन देणारी याचिका रंगाराव यांच्यावतीने मे.उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.मे.कामगार न्यायालयाने कंपनीने रंगाराव यांना सेवेतून कमी करण्याचीकारवाई योग्य असल्याचा निकाल दिला होता.कंपनीने दिलेल्या माहितीनुसार १९९५ साली मे महिन्यामधील एका कामाच्या दिवशी वरिष्ठ अधिकारी पहाणी करण्यासाठी गेले
असतारंगाराव हे स्वत:च्या मशीनवर नव्हते.ते दुसरीकडे जाऊन केस विंचरत होते.हा सर्व प्रकार नाईट शिफ्टमध्ये घडला.रंगाराव यांनी तातडीने जागेवर जाऊन कामास सुरुवात करावी असं वरिष्ठ अधिऱ्याने सांगितल्यानंतर रंगाराव संतापले. त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली तसेच तेथे पडलेली लोखंडाची सळई आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फेकून मारल्याचा आरोप कंपनीने केलाय.यानंतर कंपनीने रंगाराव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.तसेच कंपनीने अंतर्गत समिती बसवून घडलेल्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर रंगाराव दोषी आढळल्याने त्यांना कामावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला.