विदर्भात थंडी ओसरली 

Share This News

नवीन वर्षात जोरदार थंडी राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता,परंतु गेल्या दोन दिवसांपासून नागपुरात थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. नागपुरातील आज सकाळचे तापमान १८.३ अंश सेल्सियस नोंदविल्या गेले. मंगळवारी देखील नागपुरातील किमान तापमान १७ अंशावर होते. विदर्भातील इतर शहरांचे किमान तापमान देखील १६ अंशांच्या वरच नोंदविल्या गेले आहे. विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच १६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली.  दोन दिवस नागपूरसह विदर्भात तुरळक पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे पावसासोबतच थंडीत देखील वाढ होईल असा अंदाज होता परंतु  सध्यातरी तापमानात वाढ होऊन थंडी पासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. 

विदर्भातील शहरांचे आजचे किमान तापमान 

अकोला  — १८. ८ अंश सेल्सियस

अमरावती  – १८.९

बुलडाणा — १८.६ 

चंद्रपूर — १७.२ 

गडचिरोली — १८.२ 

गोंदिया — १६.५ 

नागपूर — १८.३ 

वर्धा — १८. ८ 

वाशीम — १८.० 

यवतमाळ — १६.०


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.