मेडिकलमध्ये लवकरच आयव्हीएफ केंद्र

Share This News

नागपूर
मेडिकल रुग्णालयामध्ये आयव्हीएफ या उपचार पद्धतीतून कृत्रिमरित्या गर्भधारणेने मूल जन्माला घालण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. त्यामुळे, आता लवकरच मेडिकलमध्ये आयव्हीएफसह सहा केंद्रे उघडण्यात येणार आहे.
प्रकल्पासाठी जिल्हा नियोजन समितीकडून ९५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. यातून या केंद्रांची उभारणी करण्यात येईल. मेडिकलमध्ये सुरू होऊ घातलेली ही उपचार पद्धती केवळ खाजगी रुग्णालयातच उपलब्ध आहे. शासकीय रुग्णालयामध्ये प्रथमच ही सुविधा सुरू होणार आहे. अधिष्ठाता या प्रकल्पांसाठी १२ कोटी तसेच अतिविशेषोपचार रुग्णालयातील प्रकल्पासाठी ९ कोटी रुपये, असे दोन प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले होते. त्याला मंजुरी मिळाली आहे. या उपचार पद्धतीत स्त्रीच्या शरीरात तयार होणारी बिजांडे आणि पुरुषाच्या वृषणात तयार होणारे शुक्राणू या दोघांचे मिलन शरीराबाहेर केले जाते. या पद्धतीमध्ये स्त्रीच्या शरीरातील बीजांड निर्मिती प्रक्रियेचा अभ्यास करून, जास्त बिजांडे तयार होण्याची लस देऊन ही बिजांडे बाहेर काढली जातात. बिजांड आणि शुक्रजंतू यांचा संयोग घडवून आणला जातो. यातून तयार होणारे भृण हे २ ते ५ दिवस प्रयोगशाळेत वाढविण्यात येते. एकूणच भृणापैकी चांगल्या प्रतीचे भ्रूण स्त्रीच्या गर्भाशयात सोडले जातात. याव्यतिरिक्त मानवी दुग्धपेढी आणि अस्थिपेढी असेही अभिनव प्रयोग मेडिकलमध्ये राबविण्यात येत आहे. मानवी दग्ध पेढीकरिता २५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून वैद्यकीय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांच्या कौशल्याच्या विकासाठी स्किल लॅब सुरू केली जाणार असून २ कोटी रुपयांचा प्रस्तावित खर्च आहे. नव्या कॅथलॅबसाठी ६ कोटी १५ लाख रुपये तरतूद आहे. याचाही मोठा फायदा होणार आहे. तर अस्थिपेढी प्रकल्पासाठी १ कोटी १0 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. मतिष्कमृत रुग्णाकडून मिळणारी हाडे या पेढीत राहतील. कर्करोगींना आणि अपंगांना या पेढीद्वारे उपलब्ध हाडाने ते दूर करणे शक्य होणार आहे. याव्यतिरिक्त कर्करोग रुग्णांसाठी मॉलिक्युलर लॅबचा अभिनव प्रकल्पासाठी ७0 लाख रुपये प्रस्तावित आहे. उपरोक्त सर्व प्रकल्पांच्या पूर्ततेकरिता आवश्यक यंत्रसामुग्रीची खरेदी प्रक्रिया सुरू आहे. सर्व प्रकल्प सहा महिन्यात कार्यान्वित करण्याचा प्रयत्न असल्याचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.