चंद्रपूरात जनविकास सेनेने केली कृषी कायद्याची होळी, ब्रम्हपुरी येथील शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन

Share This News

चंद्रपूर,दि.07ः- संपूर्ण देशपातळीवर शेतकऱ्यांनी दि. ६ फेब्रुवारी रोजी चक्काजाम आंदोलन पुकारले होते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चक्काजाम आंदोलनाच्या समर्थनार्थ कोरपना तालुक्यातील जनविकास सेनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी कायद्यांची होळी करून आंदोलन केले.जन विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांच्या नेतृत्वात कृषी कायद्यांची प्रतिकात्मक होळी यावेळी करण्यात आली. कोरपना-जिवती मार्गावर शेकडो शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन या आंदोलनात सहभाग घेतला.यावेळी कृषी कायद्याच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. शेतकरी हिताच्या आडून व सुधारणेच्या नावाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीचे अस्तित्व नष्ट करणे, हमीभाव पध्दत संपुष्टात आणणे तसेच मोठ्या उद्योगपतींना साठवणूक करण्यासाठी प्रोत्साहन देवून कृत्रिम भाववाढीला चालना देणे अशी अनेक कटकारस्थाने केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांच्या विरोधात रचलेली आहेत. भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत कोणत्याही सरकारने शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलेले नाही. मात्र मोदी सरकार मधील मंत्री व त्यांचे समर्थक चक्क अन्नदात्यालाच दहशतवादी म्हणायला लागले आहेत. शेतकऱ्यां विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या तसेच शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणणाऱ्या सरकारचा विरोध करण्यासाठी कृषी कायद्यांची होळी करण्यात आली अशी प्रतिक्रिया जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी दिली.या आंदोलनामध्ये जन विकास सेनचे सचिन पिंपळशेंडे,भिकू मेश्राम,सुनील बुटले,अरविंद आत्राम,किशोर मडावी,भोजीपाटील कुळमेथे,सत्यपाल कींनाके,रवी पंधरे,दिनेश झाडे,कमलेश मेश्राम,विष्णू कुंभरे,तुषार निखाडे,आकाश लोडे,गितेश शेंडे,अक्षय येरगुडे,सचिन दडमल,वसंता कुंभरे,शंभू नैताम गिरीधर तोडासे इत्यादी कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.