जयंत पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरु
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा राज्यव्यापी दौरा सुरु झाला आहे. गडचिरोलीच्या अहेरी मधून या दौऱ्याला सुरवात झालीय. राष्ट्रवादी परिवार संवाद असं या दौऱ्याला नाव देण्यात आलंय.
कार्यकर्त्यांकडून असलेल्या अपेक्षा काय आहेत,त्यांच्या भागातील समस्या काय आहेत व त्या समस्या सोडवण्यासाठी काय प्रयत्न करता येऊ शकतात यासाठी गुरुवारपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. राष्ट्रवादी परिवार संवाद असं या दौऱ्याला नाव देण्यात आलं आहे. गडचिरोलीच्या अहेरी मधून या दौऱ्याला सुरवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विश्वास ठेऊन जे कार्यकर्ते गेली अनेक वर्षे पक्षात कार्य करीत आहेत त्यांचे मनोगत जाणून घेण्यासाठी,तसेच त्यांच्या भागात असलेल्या समस्या जाणून घेण्यासाठी हा दौरा आयोजित करण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. आम्ही सत्तेत असल्याने कार्यकर्त्यांच्या काय अपेक्षा आहेत हे देखील जाणून घेणे महतवाचे ठरते यासाठी हा राज्यव्यापी दौरा आयोजित करण्यात आल्याचं जयंत पाटील म्हणाले. महाराष्ट्रातील सिंचन योजनांविषयी बुधवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेत आढावा बैठक झाली. या बैठकीतून राज्यातील सिसिन्हां विभागाच्या बऱ्याच प्रश्नांना गती मिळणार असल्याचा विश्वास देखील जयंत पाटील यांनी व्यक्त केला.