जेसीआय नागपूर मेट्रोचा पदग्रहण समारंभ मंगळवारी

Share This News

जेसीआय नागपुर मेट्रोचा १२ वा पदग्रहण समारंभ १२ जानेवारीला आयोजित करण्यात आला आहे. नागपुरातील छत्रपती चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृहात संध्याकाळी ५ वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्ष म्हणून जेसी जयकुमार नांदेडकर,सचिव म्हणून जेसी किरण रडके,कोषाध्यक्ष म्हणून जेसी विजय कुमार शपथग्रहण करणार आहेत. यावेळी ४ उपाध्यक्ष,४ संचालक व कार्यकारी मंडळाचे इतर सदस्यही शपथग्रहण करणार आहेत. या कार्यक्रमाला कांचनताई गडकरी या प्रमुख पाहुणे म्हणून तर अविनाश ठाकरे हे पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.जेसी मुकेश अशर हे मुख्य वक्ते म्हणून या कार्यक्रमाला संबोधित करतील. तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आनंद शर्मा अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.