गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी न्यायिक आयोग? राज्य सरकारमध्ये विचार सुरु असल्याचा दावा

Share This News

मुंबईः गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील गंभीर आरोपांची चौकशी न्यायिक आयोगामार्फत करण्याचा राज्यातील महाविकास आघाडीचा विचार असल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकाने दिले आहे. लवकरच याबाबत सरकारकडून घोषणा केली जाण्याची शक्यताही त्यात व्यक्त करण्यात आली आहे.
देशमुख यांनी आपल्यावरील आरोपांच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारने चौकशीसाठी तयारी सुरु केली असल्याचे सांगितले जात आहे. यासाठी चौकशी आयोग नेमून त्याची जबाबदारी एका सेवानिवृत्त न्यायाधीशाकडे सोपविली जाईल, असे समजते. त्यासाठी अद्याप सेवानिवृत्त न्यायाधीशाचे नाव मात्र निश्चित झालेले नाही, असेही सांगण्यात येते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी वर्षा येथे वरीष्ठ मंत्र्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत यावर खल झाल्याचे सांगितले.
माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे स्वतःच चौकशी लावण्याचे प्रयत्न आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.