अमरावतीतील अपहृत बालक आढळला अहमदनगरात
अमरावती : घराबाहेर खेळत असताना अपहरण झालेला चार वर्षीय नयन मुकेश लुणीया पोलिसांना अहमदनगर येथे सापडला आहे. नयन सुखरूप असून त्याला तब्यात घेतल्यानंतर पोलिस पथक अमरावतीकडे मार्गस्थ झाल आहे.
अमरावतीच्या शारदानगरातील चार वर्षीय नयन मुकेश लुणीया या बालकाचे बुधवारी अपहरण झाले होते. बहिणीसोबत खेळत असतांना दुचाकीवरून आलेल्या एका युवक-युवतीने त्याला उचलून नेले होते. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांची कसून चौकशी केली. शारदानगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंग यांनी प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश दिले होते. राजापेठ पोलिसांची विविध पथके बालकाच्या शोधासाठी रवाना झाली. त्यानुसार अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने अपहरण करणाऱ्या युवतीसह सहा आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. फलटण चौकातील हिना शाकीर शेख ऊर्फ हिना अनिकेत देशपांडे (वय २५), कोटला येथील अलसम ताहीर शेख (वय १८) हे घटनेतील प्रमुख सूत्रधार आहेत. मुसाहिब नासीर खेश (वय २२), फैरोज रसीद शेख यांनाही अटक करण्यात आली आहे.