अभियंता विद्यार्थ्यांचे अपहरण,रक्कम न दिल्यास विद्यार्थ्यांस जीवे मारण्याची धमकी

Share This News

अभियंता विद्यार्थ्यांचे अपहरण,रक्कम न दिल्यास विद्यार्थ्यांस जीवे मारण्याची धमकी. मुलगा शुभम फुटाणे (अभियंता) सायंकाळी 5 वाजता मोटार सायकल क्रमांक एमएच.34 एएस.6815 या दुचाकी फिरण्यास गेला असता तो घरी परतला नाही या काळजी मुळे शुभम च्या आईने त्याला केला असता,अज्ञात इसमाने त्याचा दूरध्वनी उचलून 30 लाखाची मागणी केली व रक्कम न दिल्यास शुभमला ठार मारू अशी धमकी दिली.शुभमचे अपहरण झाले आहे असे लक्षात येताच त्यांनी घरा शेजारी राहणारे श्रीकांत माहुलकर यांना माहिती दिली. शुभमच्या आई समवेत माहुलकर यांनी पोलिस स्टेशन गाठले व शुभमचे अपहरण झाल्याची तक्रार नोंदविली. या प्रकरणाची पोलीसांनी दखल घेत याची संपूर्ण माहिती चंद्रपूर येथील एलसीबी पथकाला दिली.त्यानुसार एलसीबीचे ठानेदार खाडे हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहचले व घटनेची पूर्ण माहिती घेतली असता त्याच्या मित्राला पोलीस स्टेशन येथे बोलावून चौकशी सुरु केली परंतु कोणताही थांगपता लागला नाही. शुभम हा अभियंता झालेला विध्यार्थी असून त्याची दुचाकी साईनगर वॉर्ड येथील दास दवाखान्या जवळ आढळून आल्याचे सांगितल्या जाते. पुढील तपास पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेडकर यांच्या नेतृत्वात चंद्रपूर येथील एलसीबीचे पोलीस निरीक्षक खाडे,व घुग्गुस गुन्हे शाखेचे सपोनि.गौरीशंकर आमटे करीत आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.