वाघ्याच्या हल्ल्यात ठार |Killed in a tiger attack

Share This News

नागभिड –तहसील अंतर्गत येणाऱ्या, तलोधी वन परिक्षेत्र, गोविंद पुर क्षेत्रात येणाऱ्या कोसंबी येथील वासुदेव रामजी कोंडेकर वय ५५ वर्ष हा सकाळी जंगलात लाकडे गोळा करून घरी आणण्याकरिता गेला होता. लाकडे गोळा केल्यानंतर मोळी उचलून नेत असताना दबा धरुन बसलेल्या वाघाने हल्ला करून ठार केल्याची घटना सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली. वनरक्षक गौरकर यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन शव ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला. शव उचलून वन विभागाने तातडीने नाग भिड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून मृतकांच्या नातेवाईकाला अन्याविधीसाठी २० हजार रुपये देण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी महेश गायकवाड यांनी घटना स्थळी पोचल्यावर सर्व चमू नी शासकीय नियमाचे अधिनस्त राहून पुढील कार्यवाही व शासकीय मदत देण्यात येईल असे सांगितले. मृतकला पत्नी सुशीला कोंडेक र, मुलगा असा परिवार आहे.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.