शिवसेनेकडून परमबीर सिंह यांचे कोडकौतूक Kodak appreciation of Parambir Singh from Shiv Sena

Share This News

मुंबईः अँटिलिया स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणी अटक झालेल्या सचिन वाझे प्रकरणात मुंबई पोलिस आयुक्त पदावरून हकालपट्टी करण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांच्या कार्यशैलीचे शिवसेनेने कौतूक केले आहे. त्यांची बदली झाल्याने ते गुन्हेगार ठरत नाहीत, असे नमूद करताना त्यांनी अतिशय कठीण काळात राज्याची सूत्रे हाती घेतली होती, अशी पाठराखण शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून करण्यात आली आहे. परमबीर सिंह यांनी कोरोनाच्या संकटाशी लढा देण्यासाठी पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये जोश निर्माण केला. धारावी झोपडपट्टी सारख्या परिसरास ते स्वतः भेट देत होते. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या, कंगना राणावत प्रकरणासारख्या गंभीर प्रकरणात त्यांनी पोलिसांचे मनोधैर्य ढळू दिले नाही. सुशांतसिंह प्रकरणात सीबीआयचा प्रवेश झाला तरी त्यांना तपासात फारशी प्रगती साधता आली नाही. टीआरपी घोटाळ्याची फाईल परमबीर सिंह यांच्याच काळात उघडली गेल्याने एका विशिष्ट लॉबीचा त्यांच्यावर रोष होता, असा दावाही शिवसेनेने केला आहे.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.