कोव्हिशिल्ड सर्वात आधी भारतात मिळणार
कोरोना विषाणूचे भयंकर संकट संपुष्टात यावे म्हणून भारतातील प्रत्येक नागरिकाला लस मिळावी यासाठी केंद्र सरकारने पूर्वतयारीला वेग दिलेला आहे. ऑक्सफर्ड-अँस्ट्राझेनेकाची लस कोव्हिशिल्ड सर्वात आधी भारताला आणि भारतीयांना उपलब्ध होईल, असे अधिकार्यांचे म्हणणे आहे.
लसीकरणासाठी तयार केलेल्या राष्ट्रीय तज्जञ चमूने राज्य सरकारांना तसेच सर्व संबंधितांना लससाठा, वितरण, नियमनासाठी तपशीलवार ब्ल्यू प्रिंट तयार केली असून, ती केंद्र सरकारला सादरही केली आहे. आरोग्यसेवक, कोरोना योद्धे, फ्रंटलाईन कर्मचार्यांचा डेटाबेस तयार करणे, कोल्ड चेन्स परस्परांशी जोडणे आणि सीरिंज-नीडल्स खरेदी या कामांना गती दिली आहे.
कोरोना लसीकरण मोहीम पुढल्या वर्षी सुरू होईल. लस क्षेत्रातील तज्ज्ञ नवीन ठक्कर यांचे म्हणणे आहे की, सरकारने लसीची कमाल किंमत ठरवून खुल्या बाजारातही ती उपलब्ध करायला हवी, जेणेकरून सरकारवर आर्थिक बोजा कमीत कमी पडेल व सरकारी यंत्रणांनाही परिस्थिती हाताळणे सोपे जाईल.
ज्या निकडीने लस विकसित होत आहे, त्याच तत्परतेने आता ती जगातील प्रत्येकापयर्ंत पोहोचायला हवी. लस खरेदी, वितरण आणि इलाज निर्धारित करण्यासाठी तातडीने ४.३ अब्ज डॉलर लागतील. पुढच्या वर्षी २३.८ अब्ज डॉलरची गरज पडेल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टॅड्रोस गॅब्रियेसिस यांनी म्हटले आहे.ज्या निकडीने लस विकसित होत आहे, त्याच तत्परतेने आता ती जगातील प्रत्येकापयर्ंत पोहोचायला हवी. लस खरेदी, वितरण आणि इलाज निर्धारित करण्यासाठी तातडीने ४.३ अब्ज डॉलर लागतील. पुढच्या वर्षी २३.८ अब्ज डॉलरची गरज पडेल, असे जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टॅड्रोस गॅब्रियेसिस यांनी म्हटले आहे.