जैविक कचरा फेकला, नागपुरातील लॅबला लाखाचा दंड Lack of organic waste, fine of Rs 1 lakh to lab in Nagpur

Share This News

नागपूर : जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासंदर्भात कडक नियम असतानाही हा कचरा उघड्यावर फेकणाऱ्या मनपा धरमपेठ झोनअंतर्गत असलेल्या एसआरएल लिमिटेड लॅबला एक लाख रुपयांचा दंड ठोठाविण्यात आला आहे.
महापालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार, ४ मार्चला ही कारवाईत केली. एसआरएल लिमिटेड लॅबने जैविक कचरा रस्त्यावर धोकादायक पद्धतीने टाकला होता. टेम्पल बाजार रोडवर हा कचरा पडून असल्याचे मनपाच्या पथकाला आढळले. त्यामुळे लॅबचे संचालक डॉ. नीरंजन नायक यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. जैविक कचरा यापुढे रस्त्यावर फेकण्यात येऊ नये, असा कडक इशारा त्यांना महापालिकेने दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव असताना जैविक कचरा रस्त्यावर फेकणे अधिक धोक्याचे ठरू शकते, ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.