हिंगणा एमआयडीसी मधील कारखान्याला मोठी आग
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी मधील लाकडी व प्लायवूड फर्निचर तयार करणाऱ्या कंपनीला आज भीषण आग लागली. हिंगणा एमआयडीसी मधील स्पेसवूड या कंपनीला दुपारी चार च्या सुमारास ही भीषण आग लागली आहे. स्पेसवूड ही लाकडी फर्निचर बनवणारी नामांकित कंपनी आहे.
संध्याकाळी 6 वाजेपर्यंत अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला आहे परंतु तोपर्यंत आग काही आटोक्यात आली नव्हती. आग कशामुळे लागली हे अजूनही अज्ञात आहे. कंपनीच्या अवतीभवती अनेक छोटे कारखाने आहेत तसेच कंपनीत प्लायवूड चा मोठा साठा असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहे.