लॉकडाऊन तोडणाऱ्यांसाठी नेत्यांचा फोन, साखरखेर्डा ठाणेदाराची सटकली!

Share This News

बुलडाणा : बुलडाण्यातील साखरखेर्डा पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. टाळेबंदीचे नियम पायदळी तुडवणाऱ्यांना पोलिसी हिसका दाखवण्याचा इशारा ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी दिला आहे. पोलीस कारवाईत हस्तक्षेप करणाऱ्या राजकारण्यांचीही ठाणेदाराने खरडपट्टी काढली. याचा व्हिडीओ समोर आला आहे.
राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. परंतु संचारबंदीचे उल्लंघन करत काही नागरिक विनाकारण भटकत आहेत. अशा टवाळखोरांना आता साखरखेर्डा पोलीस आपला खाक्या दाखवणार आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील साखरखेर्डा पोलीस ठाण्यात व्यापारी आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची एक बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत परिसरातील जिल्हा परिषद सदस्य, वैद्यकीय अधिकारी, सभापती, व्यापारी यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दररोज गावात नागरिकांना आपल्या विनयशील स्वभावातून नियम पाळण्याच्या सूचना ठाणेदार जितेंद्र आडोळे करतात. अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या मतदारसंघातील साखरखेर्डा हे महत्त्वाचे गाव आहे. तरीदेखील पोलीस वगळता प्रशासकीय यंत्रणा ढिम्म आहे. मात्र लोक ऐकतच नसल्याचे पाहून ठाणेदार अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.