तापाप्रमाणे कोविडसोबत जगायला शिकू या!

Share This News

लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सोमवारी लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, ब्रिटनचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ख्रिस व्हिट्टी यांनी ब्रिटनने यापुढे कोरोना विषाणूसोबत तापाप्रमाणेच (फ्लू) जगायला शिकले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
ब्रिटनला आता कोरोना विषाणूसोबत जगायला शिकावं लागेल. हे पाहता की २५ हजार जणांचे मृत्यू फ्लूमुळे वर्षभरात होऊ शकतात. इंग्लंड निबंर्धांमधून बाहेर पडल्यानंतर लॉकडाउन ही भूतकाळातील गोष्ट होईल. तसेच भविष्याच ब्रिटन करोना विषाणूशी तापाप्रमाणेच (फ्लू) वागेल, असे प्राध्यापक ख्रिस व्हिट्टी यांनी सूचवले. ही संख्या मथळा झाल्याशिवायही होऊ शकते, असे ते म्हणाले. हे स्पष्ट आहे की आपण या आजाराचे व्यवस्थापन करू शकतो, जसे काही ठिकाणी आपण फ्लूबाबत करतो. हा एक हंगामी आणि धोकादायक आजार आहे, ज्यामुळे हजारो लोकांचे प्राण जात असल्याचेही ते म्हणाले.
रॉयल सोसायटी ऑफ मेडिसीनच्या आयोजित वेबिनारमध्ये ख्रिस व्हिट्टी सहभागी झाले होते. सरकारचे ध्येय कोरोनामुळे होणारे मृत्यू अगदी किमान स्तरावर आणणे हे आहे. परंतु असा इशारा दिला की, हंगामी फ्लूने होणार्‍या मृत्यूंच्या समान संख्येस रोखण्यासाठी समाज व्यापक निबर्ंध सहन करणार नाही, असेही व्हिट्टी म्हणाले.
यादरम्यान त्यांनी कोरोनावर भाष्य केले. जर धोकादायक स्ट्रेन वेगाने पसरला तरच सरकारला यावर काही मोठे पाऊल उचलणे भाग पडेल. परंतु कोरोनाची म्युटेशन्स देशाच्या बाहेर ठेवली जातील हे म्हणणे वास्तववादी ठरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आपल्याला काही प्रमाणात संतुलन निर्माण करण्याची गरज आहे. ज्यामुळे आपल्याला मृत्यूदर कमी ठेवण्यास मदत होईल. परंतु ते अशाप्रकारे ठेवले पाहिजे की जनतेलाही ते शक्य होईल. लसीकरण, औषध देणे अशा प्रकारांमधून आपण मृत्यूदर कमी करू शकतो. परंतु यावेळी नागरिकांवर आर्थिक आणि सामाजिक परिणामही जास्त होऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.