पृथ्वी निरोगी करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करू : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share This News

नवी दिल्ली,  25 मार्च  कोरोना संकटाच्या सावलीत असंसर्गजन्य रोगांमुळे होणारे अकाली मृत्यू कमी करण्यासाठी भारताने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि प्रगतीसाठी संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेने केलेल्या भारताच्या प्रशंसेबद्दल  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेचे आभार मानले.  

ट्वीटरद्वारे भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ”  असंसर्गजन्य रोग रोखण्यासाठी आणि पुढे  निरोगी राहण्यासाठी केल्या जात असलेल्या  प्रयत्नांमध्ये भारत आघाडीवर आहे. संयुक्त राष्ट्र प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेने व्यक्त केलेल्या या प्रशंसेसाठी आभार . आपण सर्व  एकत्रितपणे , ही पृथ्वी निरोगी बनवूया ”


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.