नियम मोडणाऱ्यांचे लायसन्स रद्द, प्रसंगी दुकानेही सील

Share This News

विभागीय आयुक्तांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

नागपूर : कोरानाचा प्रकोप वाढल्याने पुन्हा एकदा राज्य सरकारने प्रतिबंध आणखी कडक करण्याचे आदेश सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यानुसार नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांचे लायसन्स रद्द करण्याचे व प्रसंगी दुकाने सील करण्याचे आदेश विभागीय महसूल आयुक्त संजीव कुमार यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. नियमाचे पालन होत नसल्यास जिल्हाधिकारी यांनी संबंधितांवर गंभीर गुन्हे दाखल करावे असेही सांगण्यात आले आहेत. यात भारतीय दंड संहितेच्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन कायदा यातील कलमांचा समावेश करा असे आदेश देण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतलेल्या तातडीच्या व्हीडिओ कॉन्फरसिंनंतर नागपूर महसूल विभागातील नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ आणि साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ नुसार पुन्हा प्रतिबंध कडक करण्यात आले आहेत.

 पुन्हा हे नियम बंधनकार

लग्न समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी.

अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींच्या उपस्थितीवर बंदी.

मास्कचा वापर अनिवार्य अन्यथा तातडीने दंड.

सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, क्रीडा आदी कार्यक्रमांमध्ये गर्दीवर बंदी.

हॉटेल, रेस्टोरंट, हॉटेल, खाद्यगृह येथे केवळ ५० टक्के क्षमतेला परवानगी.

जे हॉटेल-रिसॉर्ट मालक नियमांचा भंग करतील त्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल कलावा.

१३ फेब्रुवारीच्या संख्येपेक्षा तिप्पट चाचण्या करण्यात याव्या.

पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर किमान २० जणांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावे.

दुकानदार व्यावसायिकांची तपासणी करण्यात यावी.

पॉझिटिव्ह रुग्ण शोधा
कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर कोणताही व्यक्ती बाहेर फिरत असेल तर अशांना शोधण्याचे आदेश यंत्रणेला देण्यात आले आहेत. अशा व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या सर्व कामांसाठी पोलिस आणि संबंधित यंत्रणेची तातडीने मदत घ्यावी, असेही संजीव कुमार यांनी सांगितले.


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.