रविवारी दारुची दुकाने बंद – जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांचे आदेश Liquor shops closed on Sunday – Collector Ravindra Thackeray’s order

Share This News

नागपूर जिल्ह्यातील सर्व प्रकारची मद्यविक्री रविवारी बंद राहील. सोबतच पुढील आदेशापर्यंत दर शनिवार, रविवार दारूची दुकाने बंद राहतील, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत.
नागपूर शहरात शनिवार व रविवार कोरोना संसर्ग काळामध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सर्व व्यापारी प्रतिष्ठाने व दुकाने बंद ठेवण्यात आली आहे.  यापुढे ज्यावेळी जिल्हा प्रशासनातर्फे बंदचे आवाहन करण्यात येईल त्यावेळी दर शनिवार – रविवार दारू विक्रेत्यांनी देखील आपली दुकाने बंद ठेवावीत असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमिवर प्रशासनाने शनिवार व रविवारी व्यापारी प्रतिष्ठांनासह शासकीय कार्यालये बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र शनिवारला शहरातील विविध भागातील वाईन शॉपसह देशी दारूची दुकाने सुरू असल्याचे पहायला मिळालेत. त्यामुळे शनिवारला सायंकाळी जिल्हाधिकार्‍यांनी रविवारलाही दारू दुकानेही बंद राहतील, असे आदेश काढलेत


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.