लॉकडाऊन हा अंतिम पर्याय, संयमाने वागा- पंतप्रधान

Share This News

नवी दिल्ली, 21 एप्रिल : गेल्या वर्षी कोरोनाशी कशा पद्धतीने वढावे याची फारशी कल्पना नसल्यामुळे लॉकडाऊन लावाले लागले होते. परंतु, आजघडीला तशी अवस्था नाही. देशातील प्रत्येकाने संयम आणि मर्यादांचे पालन करणे अपेक्षित आहे. तसेच राज्यांनी लॉकडाऊन हा अंतिम पर्याय म्हणून विचारास घेतला पाहिजे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी केले. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपाच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते.यावेळी पंतप्रधान म्हणाले की, देशातील सर्व फ्रंटलाईन वर्कर्सचं कौतुक करतो. तुम्ही करोनाच्या पहिल्या लाटेत देखील आपला जीव धोक्यात घालून लोकांना वाचवले होते. आज तुम्ही पुन्हा या संकटात दिवस-रात्र मेहनत घेत आहात. कठिणात कठीण परिस्थितीत आपण धीर सोडता कामा नये. आपण योग्य दिशेने निर्णय घेतला तरच आपल्याला विजय मिळू शकेल असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तसेच आजच्या स्थितीत आपल्याला देशाला लॉकडाऊनपासून वाचवायचं आहे. राज्यांनी देखील लॉकडाऊनला अंतिम पर्याय म्हणून पाहावं. लॉकडाऊनपासून वाचण्याचा प्रयत्न करायला हवा. आपण आर्थव्यवस्थेसोबतच देशवासीयांच्या आरोग्याती देखील काळजी घेऊया, असे आवाहन त्यांनी केले.  देशातील काही राज्यांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. महाराष्ट्रात अनेक भागांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्याविषयी बोलताना “करोना काळात देशाच्या अनेक भागांमध्ये ऑक्सिजनची मागणी वाढू लागली आहे. या बाबतीत पूर्ण संवेदनशीलतेने काम केलं जात आहे. सगळ्यांचे प्रयत्न आहेत की प्रत्येक गरजूला ऑक्सिजन मिळायला हवा. ऑक्सिजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक पातळ्यांवर प्रयत्न केले जात असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. देशात करोनाचे रुग्ण वाढताच औषध निर्मात्या कंपन्यांकडून औषधांची निर्मिती वाढवली आहे. त्याचा वेग अजून वाढवला जात आहे. आज देशातली सगळ्यात स्वस्त व्हॅक्सिन भारतात आहे. यामध्ये आपल्या देशातल्या तज्ज्ञांनी सर्वोत्तम प्रयत्न केले आहेत. त्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचा पुरवठा आणि मदत वाढवण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भारतानं दोन भारतीय लसींच्या मदतीने लसीकरणाला सुरूवात केली. यामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रातल्या गरजू लोकांपर्यंत लस पोहोचवण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद करत पंतप्रधानांनी संशोधक आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांची पाठ थोपटली. या संकटकाळात अधिकाधिक लोकांनी पुढे यावं आणि देशवासीयांना मदत करावी. युवकांनी आपल्या सोसायटीमध्ये, परिसरात छोट्या छोट्या समित्या तयार करून करोना नियमांचं पालन करण्यासाठी मदत करावी. असे झाल्यास राज्य सरकारांना कर्फ्यू किंवा लॉकडाऊन लावण्याची गरजच पडणार नसल्याचे मोदी यांनी सांगितले. 


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.