महाराष्ट्रात 28 फेब्रुवारीपर्यंत वाढवला लॉकडाऊन

Share This News

मुंबई


महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात असला तरी कोविड 19 रुग्णांचा आकडा पुन्हा वाढ आहेत. तसेच ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने खबरदारी घेण्यात येत आहे. सध्या राज्य सरकारने बंद असलेल्या शाळा सुरु करण्यास परवानगी दिली आहे. पहिल्या टप्प्यात नववी ते बारावी व दुसऱ्या टप्प्यात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच सिनेमा हॉल व स्विमिंग पूल वरील सुरु करण्याच्या मर्यादा शासनाने यापूर्वीच हटवल्या आहेत. त्याचवेळी कोरोनाचा धोका नको म्हणून पुन्हा एकदा लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.

आता हेे लॉकडाऊन 28 फेब्रुवारीपर्यंत असणार आहे. असे असले तरी आतापर्यंत परवानगी देण्यात आलेल्या सेवा आणि गोष्टी सुरू राहणार आहेत.  या सूचनांचे पालन आवश्यक  सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक साबणाने सतत हात धुणे आवश्यक


Share This News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.