अकोला, अमरावतीत लॉकडाउन शिथिल, नागपुरात बंधने कायम Lockdown in Akola, Amravati relaxed, restrictions maintained in Nagpur

Share This News

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने अकोला, अमरावती जिल्ह्यात करण्यात आलेले लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. नागपुरातील बंधने मात्र १४ मार्चपर्यंत कायम राहणार आहेत.
दुसऱ्यांना कडक लॉकडाउन करण्यात आल्यानंतर अकोला, अमरावतीमधील व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. दोन्ही ठिकाणी व्यापाऱ्यांनी लॉकडाउन धुडकावत बाजारपेठ उघडण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न पोलिसांना हाणून पाडला व व्यापाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल केले होते. आता अकोला, अमरावतीत दर शनिवारी, रविवारी बाजारपेठ बंद असणार आहे. नागपुरात बाजारपेठ बंद करण्याची मुदत रात्री ९ वाजताची आहे. शनिवार, रविवारी बाजारपेठ पूर्णत: बंद राहणार आहे. शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू आहे. विवाह सोहळ्यात व अंत्यसंस्काराच्या वेळी केवळ २० नागरिकांना उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. ही सर्व बंधने १४ मार्चपर्यंत कायम राहणार आहे. नागपूरचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शुक्रवारी रात्री पुन्हा एकदा नागरिकांना अनावश्यक घराबाहेर पडू नका, असे आवाहन केले. विदर्भात सर्वत्र कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. नागपूर शहरात दररोज सरासरी एक हजार कोरोनाबाधित निघत आहेत.


Share This News
© 2020-21 Maharashtra Telecommunications Shankhnaad News Network, All rights Reserved | Site by final Version Software Solutions Pvt. Ltd.